उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हातील कळंब (Kalamb) तालुक्यात एका नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षय शहाजी देवकर (16) असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. अपेक्षित कॉलेजला अॅडमिशन मिळेल की नाही या चिंतेतून या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या मुलाला दहावीत 94.20% मिळाले होते. (वर्धा: बारावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्याने विद्यार्थिनीची हाताची नस कापून आत्महत्या)
घरची परिस्थिती अत्यंत बेताची असूनही त्याने दहावीत उत्तम यश मिळवल्याने गावकऱ्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणारा अक्षय घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याची डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याला लातूरच्या राजर्षी शाहु कॉलेजात प्रवेश घ्यायचा होता. नोंदणीही झाली होती. मात्र प्रवेश मिळेल की नाही या चिंतेतून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. (नाशिक: लग्न करण्यासाठी 38 वर्षीय व्यक्तीकडून ब्लॅकमेल, नदीत उडी टाकत 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या)
अक्षयच्या आत्महत्येनंतर देवकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून या प्रकरणी शिराढोण पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.