राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात एका महिलेच्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा (Jitendra Awhad Booked Under Section 354) दाखल करण्यात आला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजिनामा देण्याची घोषणा केली. या घडामोडीनंतर आता जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीची प्रतिक्रि. या पुढे आली आहे. ट्विटरद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेत आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत जोरदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, ठाणे येथेही मोठ्या प्रमाणावर तणाव जाणवतो आहे.
ऋता सामंत यांनी प्रतिक्रियेदरम्यान तीन ट्विट केली आहेत. त्यातील एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ''रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात.आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही''.
ऋता सामंत दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात, ''अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील''. तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, '' रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात.आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही''. (हेही वाचा, Jitendra Awhad Booked Under Section 354: जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा, ठाणे परिसरात तणाव; नेमकं काय घडलंय? पाहा व्हिडिओ)
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल होताच आव्हाड यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. ट्विटरवर नोंदवलेल्या प्रतिक्रियेत आव्हाड यांनी म्हटले आहे की, ''पोलिसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हा दाखल केले आहेत. ते ही 354… मी पोलिसांच्या या अत्याचाराविरुद्ध लढणार… मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे… लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.”
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव रिदा रशीद असे आहे. रिदा रशीद या महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपाच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी म्हटले आहे की, ''राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मला सर्वांसमोर अपमानीत केले. त्यांनी माला हाताने पकडून धक्का दिला. तसेच, तू इथे काय करते आहे'', असे म्हटले. मी एक महिला आहे. त्यांनी माझा सर्वांसमोर अपमान केला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असे म्हणत हे ट्विट रशीद यांनी पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केले आहे.