राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिला ही भारतीय जनता पक्षाची (BJP) पदाधिकारी असल्याचे समजते. दरम्यान, या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad booked Under Section 354) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा ट्विटरद्वारे केली आहे. 'हर हर महादेव' चित्रपट वादामुळे जितेंद्र आव्हाड चर्चेत आले आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या गुन्ह्यांतर्गत नुकतीच त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. हे प्रकरण अद्यापही चर्चेत असतानाच आता एका महिलेने दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीमुळे आव्हाड यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे. दरम्यान, आव्हाड यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावरुन ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव रिदा रशीद असे आहे. रिदा रशीद या महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपाच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी म्हटले आहे की, ''राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मला सर्वांसमोर अपमानीत केले. त्यांनी माला हाताने पकडून धक्का दिला. तसेच, तू इथे काय करते आहे'', असे म्हटले. मी एक महिला आहे. त्यांनी माझा सर्वांसमोर अपमान केला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असे म्हणत हे ट्विट रशीद यांनी पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केले आहे. (हेही वाचा, Jitendra Awhad Resignation: जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय, ट्वीट करत केला खळबळजनक खुलासा)
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल होताच आव्हाड यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. ट्विटरवर नोंदवलेल्या प्रतिक्रियेत आव्हाड यांनी म्हटले आहे की, ''पोलिसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हा दाखल केले आहेत. ते ही 354… मी पोलिसांच्या या अत्याचाराविरुद्ध लढणार… मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे… लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.”
ट्विट
NCP के विधायक जितेंद्र आव्हाड ने मुझे सरेआम बेइज्जत किया,मुझे हाथ से पकड़ कर धक्का दिया कहा तू यहां क्या कर रही है,मैं एक महिला हु इस तरह महिला का अपमान सरेआम किया जा रहा है,पुलिस प्रशासन इस पर कार्यवाई करे @PMOIndia @CMOMaharashtra @DevendraForCM @ChitraKWagh @BJPMM4Maha pic.twitter.com/7vVGBlHUIH
— Rida Rashid (@bjpridarashid) November 14, 2022
जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटरवर जाहीर केलेल्या निर्णयानंतर त्यांच्या कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. ठाण्यात काही ठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत लोकसत्ता डॉट. कॉमने वृत्त दिले आहे. तसेच, त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही काही व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओत रस्त्यांवर ठिकठिकाणी टायर जाळल्याचे पाहायला मिळत आहे.