गेल्या आठवड्यापासून राज्यात हर हर महादेव (Har Har Mahadev) सिनेमावरुन वाद चांगलाचं तापला आहे. किंबहुना त्यांत सिनेसृष्टी लांबचं राहिली पण या सिनेमाच्या वादामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. सिनेमा गृहात जावून चित्रपटाचा शो बंद करुन मराठी रसिकांना धक्काबुक्की प्रकरणी पोलिसात जितेंद्र आव्हाडांसह (Jitendra Awhad) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकही करण्यात आली होती पण अटकेच्या काही तासातचं आव्हाडांना जामीन (Bail) मंजूर झाला. पण आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर महिलेच्या विनयभंगाचे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तरी जितेंद्र आव्हाडांनी ह्याचा निषेध करत स्वतच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर ट्वीट करत राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटे गुन्हे दाखल केला आणि तोही ३५४ .मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. लोकशाहीची (Democracy) हत्या मी उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत अशा आशयाचं ट्वीट (Tweet) करत मी माझ्या आमदारकीचा राजीनामा (Resignation) देण्याचा निर्णय घेतो आहे, असं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. एवढचं नाही तर राज्यातील पोलिस खात सांभाळतस असलेले राज्यगृह मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील आव्हाडांनी सडकून टीका केली आहे. (हे ही वाचा:- Nana Patole Statement: नवीन सरकार भ्रष्टाचारामुळे आणि भीतीपोटी सत्तेवर आले आहे, नाना पटोलेंची टीका)
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
चाणक्य नाही शकुनि मामा … शिंदे साहेब जपून रहा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 13, 2022
दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) चाणक्या नाही शकूनी मामा, शिंदे साहेब जपून राहा अशा आशयाचं सुचक ट्विट (Tweet) करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) देखील सावधतेचा इशारा दिला आहे. आता या ट्विटमध्ये चाणक्या किंवा शकुनी मामा म्हणजे कोण या चर्चांना उधाण आलं आलं. तरी जितेंद्र आव्हाडांनी अप्रत्यक्षपणे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहराज्य मंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला आहे.