दोन दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्याबाबत घोषणा केली, तेव्हापासून लोक त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा वापरण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबत आहेत. लोकांकडे 2,000 रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा तसेच त्या बदलून घेण्याचा पर्याय आहे, मात्र बहुतेक लोकांना स्वतःकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा खर्च करायच्या आहेत. यासाठी काहींनी सोनाराच्या दुकानात गर्दी केली, तर अनेकजण पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी रांगा लावून त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा खर्च करताना दिसले.
देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपावर 2000 रुपयांच्या नोटा वापरून बिल भरणाऱ्या ग्राहकांमध्ये वाढ झाल्यामुळे, कर्मचाऱ्यांना रोख रकमेचा सामना करणे आणि सुट्टे पैसे देणे कठीण झाले. अहवालानुसार, अनेक गॅस फिलिंग स्टेशन्सनी 2000 रुपयांच्या नोटेच्या बदल्यात सुट्टे पैसे देण्यास नकार दिल्याचे निदर्शनास आले. गोंधळ टाळण्यासाठी काही पेट्रोल पंपांनी तर 2000 रुपयांच्या नोट स्वीकारणेही बंद केले. मुंबईमधील अनेक पेट्रोल पंप 2000 रुपयांची नोट स्वीकारत नसल्याचे दिसून आले आहे.
Today went to petrol pump in mumbai he said owner given instructions not to accept 2000 note . If this is legal tender then how the pump says not accept .after argument I have paid by credit card @CNBC_Awaaz @RBI @amitgupta0310 @RoyLakshman @MumbaiPolice pic.twitter.com/3mszy0h1da
— DILIP JAIN (@DilipPichholiya) May 20, 2023
@DirMktg_iocl @DirMktg_iocl @IOCRetail @FinMinIndia @RBI @nsitharaman @PMOIndia This sign at an Indian Oil Petrol Pump says all about how and panic can be created with wrong understanding of simple withdrawal process for ₹2000 currency. Pl take care and inform your pumps. pic.twitter.com/Fe6DPWMVVr
— nipunsheth (@nipunsheth2) May 21, 2023
दक्षिण कोलकाता येथील जोधपूर पार्क येथील पेट्रोल पंपावर 2,000 रुपयांची नोट स्वीकारली जात आहे, मात्र त्यासाठी कमीत कमी 800 रुपयांचे पेट्रोल भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. अहवालानुसार, आरबीआयच्या घोषणेनंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी रोख व्यवहारांमध्ये अचानक वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली, मात्र त्या 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा करता येणार आहेत. (हेही वाचा: बँक खात्यात 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक ठेवींसाठी पॅनची आवश्यकता 2,000 रुपयांच्या नोटांवरही लागू)
2000 notes not accepted. Petrol pump pic.twitter.com/BvbXz78M7w
— Bilkul Sahi 🇮🇳 (@BilkulSahi) May 21, 2023
दरम्यान, मोदी सरकारने 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये 2,000 च्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. आता आरबीआयने बँकांना 2,000 रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे. हा बदल आरबीआयच्या ‘क्लीन नोट पॉलिसी’च्या अनुषंगाने करण्यात आला आहे, असे आरबीआयने आधीच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.