उल्हासनगर येथून Tocilizumab इंजेक्शनाचा काळाबाजार करणाऱ्या निवृत्त शिक्षिकेला अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

उल्हासनगर येथून अन्न व औषध प्रशासनाने कल्याण गुन्हे शाखेच्या मदतीने एका 56 वर्षीय निवृत्त शिक्षिकेला अटक केली आहे. सदर महिला कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी लागणाऱ्या Tocilizumab या औषधाचा काळाबाजार करत असल्याची घटना समोर आली आहे. निता पंजावनी असे निवृत्त शिक्षिकेचे नाव आहे. ती उल्हासनगर मधील मनिषा नगर येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मनिषा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर असे समोर आले की, त्यांच्याकडे 1 Tocilizumab इंजेक्शन असून त्याची मूळ किंमत 40,545 रुपये असून ते तब्बल 60 हजार रुपयांना विक्री केली जात होती. ते सुद्धा या इंजेक्शनचे बिल ही देण्यात येणार नव्हते.(कल्याण-डोंबिवली महापालिकेची खासगी रुग्णालांच्या विरोधात कारवाई, COVID19 च्या रुग्णाला तब्बल 3.3 लाख रुपयांचे अतिरिक्त बिल दिल्याचा प्रकार उघडकीस)

कल्याणचे वरिष्ठ पोलीस संजू जॉन यांनी एफडीएच्या टीमसोबत मिळून ही कारवाई केली आहे. या शिक्षिकेला इंजेक्शनची विक्री करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी शिक्षिकेला अटक करण्यासाठी खोटा ग्राहक पाठवला असता तिला त्यावेळी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शिक्षेकेला हे इंजेक्शन कोठुन मिळाले याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दोन दिवसांपूर्वीच ठाणे येथून कोविड, कॅन्सरवरील औषधांची 5 पट अधिक किंमतीने विक्री करणाऱ्या पाच जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन वैद्यकिय प्रतिनिधी, माजी फार्मासिस्ट यांचा सुद्धा या प्रकरणी समावेश आहे. आरोपींकडून कोविड आणि कॅन्सरच्या रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याची माहिती समोर आली आहे. तर Remdesivir या औषधाची मूळ किंमत जी 5 हजार रुपये आहे ती काळाबाजार करत 25 हजार रुपयांना आणि Tocilizumab हे औषध ही 5 हजारांना आहे ते सुद्धा 80 हजार रुपयांना विकले जात होते.