Arrest | Representational Image | Photo Credits: File Photo

ठाणे येथून कोविड, कॅन्सरवरील औषधांची 5 पट अधिक किंमतीने विक्री करणाऱ्या पाच जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन वैद्यकिय प्रतिनिधी, माजी फार्मासिस्ट यांचा सुद्धा या प्रकरणी समावेश आहे. आरोपींकडून कोविड आणि कॅन्सरच्या रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याची माहिती समोर आली आहे. तर Remdesivir या औषधाची मूळ किंमत जी 5 हजार रुपये आहे ती काळाबाजार करत 25 हजार रुपयांना आणि Tocilizumab हे औषध ही 5 हजारांना आहे ते सुद्धा 80 हजार रुपयांना विकले जात होते. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त एनटी कदम यांनी माहिती दिली आहे.

अरुण रामजी सिंग (घाटकोपर), सुधाकर गिरी(खार), रविंद्र शिंदे (कोपर खैराणे) आणि कामोठे येथे राहणाऱ्या वसिम शेख आि अमिताभ दास यांना ठाणे पोलीस गुन्हे शाखा आणि फुड्स अॅन्ड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशन यांनी केलेल्या संयुक्त कारवाईनुसार ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांना औषधांचा काळाबाजार केला जात असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी एका व्यक्तीला गिऱ्हाइक म्हणून औषधे खरेदी करण्यासाठी पाठवले. त्यानुसार औषध खरेदी करण्याचे डील झाल्यानंतर पोलीस गुरुवारी रात्री 9 वाजता ठरलेल्या जागी पोहचले. त्यावेळी दोन व्यक्ती ती औषधे घेऊन आले असता त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.(Coronavirus in Thane Jail: ठाणे कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यासह 20 कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण; महाराष्ट्रातील तुरुंगात आतापर्यंत 800 जण संक्रमित)

या प्रकरणी अधिक तपास केला जात असून कॅन्सवरील औषधे आणि गर्भपात किट्स यांच्या संदर्भात त्यांच्याकडे अधिकृत परवाना नसल्याचे ही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच वडाळा येथील आरोपी अन्य जणांना इंजेक्शनचा पुरवठा करत असल्याचे ही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात ठाणे पोलीस स्थानकात आयपीसी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.