Solapur Rape Case: लग्नाचा आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल, सोलापूरातील घटना
Representative Image

Solapur Rape Case: सिनेअभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांना कारवाई सुरु केली आहे. आरोपी महाराष्ट्रातील सोलापूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा-महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीला अटक, मुंबईतील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री असलेल्या महिलेवर एका तरुणाने गेल्या वर्षी लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच, शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी महिलेने पुणे पोलिसांना तक्रार केली. तक्रारीनुसार पुणे पोलिसांनी गुरुवारी सोलापूर येथील गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये आरोपींविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2) एन, 377, 323, 504, 506 आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला .

तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, आरोपी फेसबुकवरून महिलेच्या संपर्कात आला होता. आरोपी विवाहित आहे. ऑगस्ट 2023 पासून ते एकमेकांशी बोलत आहे. आपल्या पत्नीशी घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्न करेन असं आरोपीने सांगितले. लग्नाचे वचन देत महिलेला फसवले. तिच्याशी शारिरिक संबंध ठेवला. काही दिवसांनतर आरोपीने महिलेशी बोलणं बंद केल आणि तिला मारुन टाकण्याची धमकी गिली. ही गोष्ट महिलेला असहाय्य झाल्याने तीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.