Mumbai Crime News: महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीला अटक, मुंबईतील घटना
Representative Image

Mumbai Crime News:  मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात सतत सुरक्षतेचा प्रश्न उभा राहत आहे. दरम्यान मुंबईत (Mumbai) एका महिला डॉक्टरवर बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीवर गावदेवी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला एका क्लबमध्ये बॅडमिंटन खेळत असताना  झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. घरगुती कारणांमुळे महिला एकटी आणि पतीपासून वेगळी राहत होती. महिलेचा आरोप आहे की,  या विषयावर बोलण्यासाठी व्यक्तीने बोलण्याची ऑफर दिली होती. परंतु जेव्हा ती त्याला भेटायला गेली तेव्हा त्याने तिला जबरदस्तीने मद्यपान करून दिले आणि त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पैसे न दिल्यास तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​त्याने तिच्याकडून पैसे घेतले.

या प्रकरणी पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतला. गावदेवी पोलीस ठाण्यात आरोपीवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावदेवी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.