शिवसेना-भाजप यांच्यातील तिढा सोडविण्यासाठी रामदास आठवले-शरद पवार यांच्यात चर्चा; घेतली संयुक्त पत्रकार परिषद
Sharad Pawar And Ramdas Athawale | (Photo Credits: Twitter /ANI)

शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) यांच्यातील सत्तासंघर्षाचा तिढा सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पुढाकार घ्यवा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले आहे. भाजप-शिवसेना यांच्यात सत्तावाटपावरुन निर्माण झालेला सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. या दोन्ही पक्षातील सत्तासंघर्ष कसा संपवावा यासाठी मार्गदर्शन आणि सल्ला घेण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांचे मुंबई येथील निवासस्थान 'सिल्वर ओक' येथे ही बैठक पार पडली. या भेटीनंतर आठवले आणि पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

या वेळी बोलताना शरद पवार पुनरुच्चार केला की, भाजपकडे सर्वाधिक बहुमत आहे. शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. खास करुन रामदास आठवले यांनी हा तिढा सोडविण्यात पुढाकार घ्यावा. केंद्रातही रामदास आठवले जेव्हा एकादे मत किंवा भूमिका मांडतात तेव्हा त्यांचे म्हणने केंद्रातील सत्ताधारी पक्ष गांभीर्याने घेतात. त्यामुळे या संघर्षात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावावी असे पवार यांनी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे शिवसेना किंवा भाजपने कोणताही प्रस्ताव आला नाही. तसेच, राज्यातील सध्यास्थिती पाहाता हा तिढा लवकर सुटावा, असेही पवार म्हणाले. (हेही वाचा,Maharashtra Government Formation Live News Updates: भाजप-शिवसेनेमधील कोंडी फुटण्याची शक्यता, उद्धव ठाकरे आमदरांची 5 वाजता भेट घेणार )

दरम्यान, आमच्यात विचारभिन्नता असली तरी, आपण आणि पवारसाहेब गेली अनेक काळ चांगले सहकारी राहिलो आहोत. त्यांना राज्यातील आणि देशात निर्माण झालेले पेच सोडविण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आलो होतो, असे रामदास आठवले यांनी सांगितले.