भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात एकही पायाभूत काम केलेले नाही असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच त्यांनी, "देवेंद्र फडणवीस यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेने भाजपला बहुमत नाकारले," असाही टोला फडणवीसांना लगावला. 

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपांचा उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ते म्हणाले, "भाजप पक्षाचा सत्तेवर नाही तर सत्यावर विश्वास आहे." तसेच उद्धव ठाकरे यांनी मांडलेले सर्व मुद्दे त्यांनी फेटाळून लावले. फक्त शिवसेनेच्या भूमिकेमुळेच महाराष्ट्राची जनता वेठीस आहे असंही ते म्हणाले 

संजय राऊत यांनी थोड्या वेळापूर्वी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. आणि आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली पाहायला मिळत आहेत. काँग्रेस पक्षाचे बडे नेते आता शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात सिल्वर ओक च्या दिशेने.

शिवसेना पक्षाच्या आमदारांना रंगशारदा मधून दुसरीकडे हलवण्यात येत आहे. पण हे आमदार कुठे जात आहेत याबद्दल उद्धव ठाकरे यांना विचारला असता त्यांनी, "आम्ही आमचे आमदार कुठेही नेऊ," असं उत्तर दिलं आहे.  

राम मंदिराच्या निकालावरही उद्धव ठाकरे यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, "राम मंदिराचा निकाल हा न्यायलयाकडून आलेला निकाल, सरकारचा काहीही संबंध नाही." तसेच, "खोटं बोलणारी लोकं कोणत्या तोंडाने रामाची पूजा करणार आहेत?" असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांचे कॉल न उचलण्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "हो मी देवेंद्र फडणवीसांशी बोललो नाही. कारण मला खोटं पाडणाऱ्या माणसाशी मी बोलणार नाही." तसेच, "खोटं बोलणं कुठल्या हिंदुत्वात बसतं, RSS ने सांगावं, " असा सवालही त्यांनी विचारला.

"शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबावर, माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला आहे. पण अमित शहा आणि कंपनीने कितीही खोटारडेपणाचे आरोप केले तरी जनतेला खोटारडेपणा कोण करतो माहित आहे," असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत लगावले. इतकाच नव्हे तर "अमित शहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपद आणि समसमान फॉर्म्युला ठरला होता," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात. त्यांनी सर्वप्रथम देवेंदनरा फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री असं संबोधलं आणि त्यांना धन्यवाद असं म्हणाले. 

"शिवसेना चुकत आहे असं मला वाटतं कारण अमित शहा म्हणाले आहेत की अडीच वर्षाचा फक्त विषय निघाला होता निर्णय झाला नव्हता" असं नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 

आम्ही ठरवलं  तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच पुढील राजकीय रणनिती काय असेल याबाबत उद्धव ठाकरे थोड्याच वेळात  पत्रकार परिषद घेणार आहेत.  

Load More

03महाराष्ट्रात सत्ता संघर्ष शिगेला पोहचलेला असताना आज नितीन गडकरी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळी अटल बिहारी वाजपेयी यांची कविता ट्वीट केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आहे. आज संजय राऊत यांनी भाजप- शिवसेना मध्ये कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नसल्याच म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना पक्ष समान सत्ता वाटपावर आग्रही असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावं ही मागणी रेटून धरत आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं हे महाराष्ट्रासाठी अन्यायकारक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र कधीच कोणासमोर झुकणार नाही. शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नाहीत असेदेखील त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ अवघ्या काही तासांमध्ये संपणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 9 नोव्हेंबर पर्यंत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यपाल यांच्याकडे 'हे' पर्याय

संजय राऊत ट्वीट

सध्या शिवसेनेचे सारे आमदार वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये एकत्र जमले आहेत. आज भाजपा सह राज्यातील सार्‍याच पक्षांमध्ये महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडणार आहेत.