Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आता येत्या 9 एप्रिल रोजी ठाणे (Raj Thackeray Sabha In Thane) येथे सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांची मुंबई येथील शिवाजी पार्क येथे गुढी पाडव्या दिवशीच (2 एप्रिल) पार पडली. आता तर कोणती निवडणूकही नाही. त्यामुळे अवघ्या आठवडाभरात दुसरी जाहीर सभा घ्यावी असे राज ठाकरे यांन का वाटले असावे? असा सवाल सर्व स्तरातून उपस्थित केला जातो आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी याबाबत एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पाहायला मिळतो.

मुंबई येथील शिवतीर्थ मैदानावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचे तीव्र पडसाद उमटले. अनेकांनी त्यावर टीका केली तर काहींनी त्याला पाठिंबाही दर्शवला. मनसे कार्यकर्त्यांमध्ये मात्र त्याहून मोठाच संभ्रम तयार झाला. मशिदीवरील भोंगे राज्य सरकारने हटवावे नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हवतील. तसेच, त्याविरोधात हनुमान चालीसा पटण देखील केले जाईल, राज यांनी म्हटले होते. यावरुन खुद्द मनसे कार्यकर्त्यांमध्येही नाराजी होती. काही पदाधिकाऱ्यांनी तर थेट राजीनामे दिले होते. पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनी तर थेट उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. (हेही वाचा, BMC Elections 2022: मनसे-भाजप युती होणार का? मुंबईतील भाजप नेत्याने काय म्हटले पाहा)

ट्विट

संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, शिवतीर्थावर झालेल्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर अनेकांना मिरच्या झोंबल्या. पण काहींनी त्यावरुन अनेक समज-गैरसमज करुन घेतले. त्यामुळे ठाणे येथे होणारी सभा ही एका अर्थाने 'उत्तरसभा' असणार नाही. आपल्या परंपरेत कोणतीही एखादी मोठी पूजा घातली की त्यानंतर उत्तरपूजा केली जाते. तशीच आता शिवाजी पार्क मैदानावरील राज ठाकरे यांच्या सभेनंतर ठाणे येथे 'उत्तरसभा' घेतली जाईल. ही सभा येत्या 9 एप्रिल रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतनजवळ सायंकाळी 6.30 वाजता असणार आहे, अशीही माहिती देशपांडे यांनी दिली आहे.