Raj Thackeray | PC: Twitter

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आता हिप बोन वरील शस्त्रक्रियेनंतर आज दोन महिन्यांनंतर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह मोड मध्ये आले आहे. दादर च्या रविंद्र नाट्यगृहामध्ये त्यांनी आज पदाधिकार्‍यांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उद्या (24 ऑगस्ट) दिवशी पुणे दौर्‍यावर जाणार असल्याचं म्हटलं आहे. शस्त्रक्रियेदरम्यानच्या गंमतीशीर किश्श्यांनी त्यांनी आज भाषणाला सुरूवात केली. त्यानंतर मनसे वर सातत्याने 'आंदोलन अर्धवट सोडत असल्याच्या' आरोपावर भाष्य केले आहे. सोबतच त्यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलताना सध्याचं राजकीय वातावरण राज्यासाठी चांगलं नसल्याचं म्हटलं आहे. ही सत्तेची आणि आर्थिक अ‍ॅडजेस्टमेंट असल्याचं म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी यावेळी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ज्याचे आमदार अधिक त्याचा मुख्यमंत्री असं ठरलेलं असताना नवी कमिंटमेंट घेतली कशी? सोबतच जाहीर भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद होणार असं सांगितलं असताना तेव्हाच आक्षेप का घेतला नाही? असं म्हटलं आहे. तसेच जनता जोपर्यंत राजकारण्यांना धडा शिकवत नाही तोपर्यंत स्थिती बदलणार नाही.

दरम्यान शिवसेनेत झालेली अन्य बंड आणि आपलं बंड यांची तुलना होऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे. वारसा वास्तूंचा नाही विचारांचा असतो तो माझ्याकडे असल्याचं म्हटलं आहे. यावेळी नाव न घेता आपण बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत असल्याचं म्हटलं आहे.   इतर कोणत्याही पक्षापेक्षा मनसे कडून सर्वाधिक आंदोलनं झाली आणि ती यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा देखील समाचार केला आहे.

नुपूर शर्मा आणि झाकीर नाईक यांना वेगवेगळा न्याय कसा? असा सवाल त्यांनी विचारला आहे. यावेळी त्यांनी ओवेसी भावंडांवरही हल्लाबोल केला आहे. सरकार त्यांना चाप का लावत नाही असेही विचारलं आहे.

राजकारण हा मोठा विषय आहे. सर्वसामान्यांनी यामध्ये सहभाग घेणं आवश्यक असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. उत्तरेकडील राजकारण महाराष्ट्रात घुसत असल्याचं म्हटलं आहे.   बहुसदस्यीय वॉर्ड पद्धतीवर देखील राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. नक्की वाचा: BS Koshyari Controversial Statement: 'मराठी माणसाला डिवचू नका!' Raj Thackeray यांचा राज्यपाल भगत सिंग कोश्यारींवर हल्लाबोल .

मनसे कार्यकर्त्यांना कानमंत्र

आगामी निवडणूका पूर्ण ताकदीने लढवा. लाचारीने निवडणूका लढवू नका. आर्थिक अ‍ॅडजेस्टमेंट करू नका असा सल्ला दिला  आहे. तुमची किंमत शून्य करून घेऊ नका. असेही कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. 9 सप्टेंबर अनंत चतुर्दशी नंतर पुन्हा दौरे सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मनसे कार्यकर्त्यांची नोंंदणी जोरात करण्याचे आदेश दिले आहेत.