महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी काल मुंबई, महाराष्ट्राबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील एक ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी 'उगीच कुणी काय सांगितलं म्हणून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण गढूळ करू नका आणि मराठी माणसाला डिवचू नका' असं म्हणत आपला निषेध व्यक्त केला आहे. नक्की वाचा: BS Koshyari Controversial Statement: 'मुंबई' बाबतच्या आक्षेपार्ह विधानावर Supriya Sule ते Sandeep Deshpande, Sanjay Raut यांनी दिली ही प्रतिक्रिया.

राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)