रायगड येथील सरपंच महिलेची हत्या, झुडपात विवस्र अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

Raigad: रायगड तालुक्यातील महड येथील 48 वर्षीय सरपंच महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर तिचा मृतदेह बेलोशी गावातील झाडाझुडपात दुपारी 1.30 सापडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी महड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आयपीसी कलम 302,301 अंतर्गत ही कारवाई केली आहे.(Mumbai Online Fraud: मुंबईत निवृत्त बँक अधिकाऱ्याची 12.50 लाखांची ऑनलाइन फसवणूक, आरोपीवर गुन्हा दाखल)

सोमवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास तेथील स्थानिक तरुण मुलगा बेलोशी गावाच्या रस्त्यावरुन जात होता. तेव्हा त्याला रस्त्यालगत एक बॅग दिसली. त्यानंतर तो बॅगेजवळ जात त्यामध्ये काय आहे हे पाहिले असता त्याला नग्न अवस्थेतील मृतदेह त्यात आढळून आला. असा प्रकार पाहिल्यानंतर मुलाने तातडीने पोलिसांना कळवले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.(Thane: महिलेवर अॅसिड हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता तरुण, पोलिसांनी आवळल्या मुसक्या)

पोलिसांनी पीडितेला स्थानिक शासकीय रुग्णालयात नेले. परंतु तिला तेथे मृत घोषित करण्यात आले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दिला असून त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर पुढील काही गोष्टी स्पष्ट होतील असे पोलिसांनी सांगितले. त्याचसोबत मृत्यूपूर्वी तिच्या सोबत लैंगिक अत्याचार करण्यात आले होते का याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जात आहे. जर हे स्पष्ट झाल्यास आरोपीच्या विरोधात आयपीसी कलम 376 अंतर्गत कारवाई केली जाईल असे ही पोलिसांनी सांगितले आहे.