Bandh Representative Image | (Photo Credits: PTI)

Pune Bandh: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी पुकारलेल्या 13 डिसेंबरच्या बंद (Pune Bandh) ला महाराष्ट्रातील पुणे शहरातील व्यापाऱ्यांच्या संघटनेने (Federation of Traders Associations of Pune FATP) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना, संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटनांनी बंदची हाक दिली आहे.

गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे (एफएटीपी) चे अध्यक्ष फतेहचंद रांका (Fatehchand Ranka) म्हणाले की, राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संभाजी ब्रिगेडने व्यापारी संघटनेला केले आहे. (हेही वाचा - Bhagat Singh Koshyari Controversial Statement: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य,  म्हणाले “शिवाजी जुन्या काळातले आदर्श”)

रांका पुढे म्हणाले की, पक्षांच्या आवाहनानंतर युनियनच्या सदस्यांनी बैठक घेतली. ज्यामध्ये बंदला पाठिंबा देत मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी गेल्या महिन्यात औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे "जुन्या काळातील" आदर्श असल्याचे म्हटले होते.