Pune Shocker: बंद खोलीत दोन मृतदेह आढळून आल्याने पुण्यातील नऱ्हे परिसरात खळबळ
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Pune Shocker:  सोलापूरात एका जन्मदात्या बापाने मुलाची हत्या केल्याची खळबळ असताना, पुण्यात नन्हे गावात एक बंद फ्लॅटमध्ये वडील आणि मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. नऱ्हे येथील व्हिजन इंग्लिश मीडियाम शाळेजवळ असलेल्या एका सोसायटीतील बंद फ्लॅटमध्ये दोघांचा मृतदेह आढळला आहे. दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. (हेही वाचा- अश्लिल व्हिडिओ पाहतो म्हणून संपवलं मुलाला, जन्मदाता बापाला अटक, सोलापूरात खळबळ)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका सोसायटीतील बंद खोलीत वडिलांचा आणि त्याच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांना फोन आला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांचे ही मृतदेह ताब्यात घेतले. नागरिकांना घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. दोघांचे मृतदहे पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण पायगुडे (वय वर्ष 64) आणि ओमकार पायगुडे (वय वर्ष 32) अशी मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत मुलगा आणि त्याचे वडिल एकाच घरात राहायचे. अरुण यांच्या मुलीचे लग्न झाल्याने ती सासरी राहते. अरुण हे रेल्वेतून निवृत्त झाले होते. काही वर्षापूर्वी ओमकार यांच अपघाता झाला होता. तर या अपघातात गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान, यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडलेली होती. त्याच्या विचित्र वागण्यामुळे तो घरात जास्त वेळ असे.  दोघांनाही दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे दोघे ही रोज दारू पित असे.

बुधवारी सोयायटीतील व्हॉचमॅन कामानिमित्त दारात आला, दार ठोकल्यानंतर ही कोणताही प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे घरात गेल्यावर दोघे ही निपचित बेड पडून आल्याचे दिसले. आवाज दिल्यानंतर ही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.या घटनेची माहिती नागरिकांना देण्यात आली आणि नागरिकांनी या प्रकरणी पोलिसांना फोन करून सांगितले.