Solapur Crime: अश्लिल व्हिडिओ पाहतो म्हणून संपवलं मुलाला, जन्मदाता बापाला अटक, सोलापूरात खळबळ
Father Killed Son PC Twitter

Solapur Crime: महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या पोटच्या मुलाची एका बापाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी बापाला या घटनेअंतर्गत अटक करण्यात आले आहे. आरोपीचे नाव विजय आहे. विजय आपल्या पत्नी आणि मुलासह सोलापूर शहरात राहतो.  मुलाला विषारी औषध देऊन त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह नाल्यात फेकला.मृत मुलगा नववीत शिक्षण घेत होता. ( हेही वाचा- क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा फोनवर अॅडल्ट कंटेंट पाहायचा आणि मुलींची छेडछाड केल्याच्या प्रकरणी विजया तक्रार येऊ लागल्या. या गोष्टीला कंटाळून बापाने मुलाची हत्या केली आहे. विजयने मुलाला कामानिमित्त बाईकवरून बाहेर नेले. तुळजापूर येथे काम असल्याने दोघे ही घरातून निघाले. तेथे त्याने मुलाला विषारी औषध पाजले त्यानंतर तो बेशुध्द झाला आणि त्याचा मृत्यू झाला. विजयने त्याचा मृतदेह घरा जवळील नाल्यात नेऊन टाकला. ही घटना १३ जानेवारी रोजी घडली. त्यानंतर १४ जानेवारीला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी तातडीने मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु काहीच हाती लागले नाही.

पोलिसांनी सतत विजय आणि त्याच्या पत्नीची चौकशी केली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी चक्र फिरवत या घटनेचे रहस्य समोर आणले. चौकशी समोर मुलाच्या हत्येचे गुढ समोर आले. विजयने खूनाची कबुली पोलिसांना दिली. मुलगा फोनवर अश्लिल व्हिडिओ पाहत असायचा आणि शाळेतून देखील त्याच्या अनेक तक्रार यायच्या त्यामुळे मुलाला संपवून टाकण्याचा कट रचला. विजयच्या पत्नीने देखील मुलाच्या हत्येचे रहस्य लपवून ठेवले होते. विजयवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 28 जानेवारीला पोलिसांनी विजयला अटक केले.