Pune Crime: क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल
Attack | Representational image (Photo Credits: pxhere)

Pune Crime: पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण अलीकडे वाढ झाली आहे. दिवसेंदिवस कोयता गॅग आणि चाकू हल्ल्याच्या घटना समोर येत आहे. दरम्यान पुण्यात शाळकरी मुलांनी एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आले आहे. शहरातील भवाने पेठेतील रामोशी गेट जवळ ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरातच  नव्हे तर पुर्ण शहरात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला; विरारच्या घटनेमुळे परिसरात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेय मुलांयने एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार केल्याची माहिती पोलिस ठाण्यात माहिती मिळाली. या घटनेत पीडीत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी  चार मुलांवर तक्रार दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. जखमी झालेला मुलगा हा इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. आरोपी मुलं ही खडक येथील महापालिकेच्या एका शाळेत शिकतात. पीडित मुलाचा आणि आरोपी मुलाबरोबर काही कारणावरून वाद झाला होता. त्यामुलाने शाळेतील मित्रांना हा प्रकार सांगितला.

त्यानंतर मंगळवारी दुपारी तक्रारदार मुलगा घरी जात असताना, चौघांनी अडवले.  तुला मस्ती आली का ? असं म्हणत मुलाला साखळी आणि बेल्टने बेदम मारहाण केली. त्याच्या छातीवर चाकूने वार केला. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी हल्ला करणाऱ्या मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.