Pune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या
Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुण्यात (Pune) 26 वर्षीय चुलत दीराने 19 वर्षीय वहिनीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान पुण्यात सोमाटणे गावातील (Somatane Village) ही घटना आहे. या प्रकरणी दीराला अटक करण्यात आली आहे तर त्याचा मित्र आणि खूनातील त्याचा सहआरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. या बलात्कार आणि हत्या प्रकरणा प्रकरणी गुन्हा तळेगाव पोलिस स्टेशन मध्ये दाखल आहे.

TOI च्या रिपोर्ट नुसार, तरूणीचा मृतदेह तळेगाव दाभाडे मध्ये सोमवारी (20 सप्टेंबर) एका टेकडीवर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. रविवारी मृत तरूणीचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यावेळी दीराने मित्रासोबत बाहेर फिरायला याल का अशी विचारणा केली. यावेळी त्यांनी टेकडीवर देवदर्शनाला जाऊ असं म्हटलं. ती तयार झाली. नंतर टेकडीवर मित्राकडून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. लैंगिक अत्याचाराला तिने विरोध करताच ओढणीने तिचा गळा घोटण्यात आला. दरम्यान तरूणीची ओळख पटू नये म्हणून तिचं डोकं दगडाला आपटण्यात आलं. नंतर झाडावर तिचा मृतदेह लटकवला. नक्की वाचा: Thane Shocker: भिवंडी मध्ये 16 वर्षीय गतिमंद मुलीवर कुटुंबातील व्यक्तीकडूनच बलात्कार.

ANI Tweet 

मृत तरूणीच्या पतीने घरी परतल्यानंतर तिची शोधाशोध केली. चुलत भावाकडे तिची विचारणा केली तेव्हा त्याला उडवा उडवीची उत्तरं मिळाली. त्यामुळे त्याचा संशय बळावला आणि तो चुलत भावाला घेऊन पोलिसांकडे आला.

पोलिसांकडून हत्या आणि बलात्काराच्या कलमांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीच्या फरार मित्राला देखील शोधण्याचं काम सुरू केलं आहे.