ठाण्यामध्ये (Thane) एका 16 वर्षीय गतिमंद मुलीवर तिच्या कुटुंबातील एका नातेवाईकाकडून बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) भागातील आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार बलात्कार (Rape) शुक्रवार 10 सप्टेंबर दिवशी झाला असून रविवारी संबंधित 48 व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. Ulhasnagar Rape: उल्हासनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरात 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, एकास अटक.
पीडीत मुलीने तिच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देताच त्यांनी भिवंडी तालुका पोलिस स्टेशन मध्ये धाव घेतली. पीडीतेची त्यानंतर वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली असल्याची माहिती भिवंडी पोलिसांनी दिली आहे. या घटनेतील आरोपीवर पोक्सो अॅक्ट अंतर्गत आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई मध्येही साकीनाका परिसरात एका मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने शहर हादरलं आहे. यामध्ये त्या मुलीचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या पोलिस तपास सुरू असून पीडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. याबाबतचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.