Ulhasnagar Rape: उल्हासनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरात 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, एकास अटक
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून बलात्काराचे (Rape) सत्र सुरुच आहे. राज्यातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. मुंबईच्या (Mumbai) साकीनाका (Sakinaka) येथे गुरुवारी घडलेल्या निर्भया'सारख्या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले आहे. यातच उल्हासनगर (Ulhasnagar) रेल्वे स्टेशन परिसरात एका नराधमाने एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शिर्डीहून कल्याण येथे एका खासगी बसने आली होती. त्यावेळी उल्हासनगर स्थानकास लागून असलेल्या स्कायवॉकवर ही पीडित अल्पवयीन मुलगी उभी होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला. त्यानंतर आरोपीने तिला जवळच्या रेल्वे क्वार्टरमधील एका वेगळ्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यानंतर पीडिताला घटनास्थळी ठेवून तेथून पळून गेला. हे देखील वाचा- Amravati: अमरावतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्याने पीडिताची गळफास लावून आत्महत्या

एएनआयचे ट्वीट-

या घटनेनंतर पीडित मुलगी पहाटेपर्यंतच त्या खोलीतच होती. त्यानंतर पीडिताने आपल्या मित्राला फोन करून तिच्या मित्राला याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.