Boy falls on Metro Track: खेळता खेळता मुलाचा तोल गेला अन् मेट्रो रुळावर पडला, पहा पुढे काय घडले
Metro Pune PC Twitter

Boy falls on Metro Track: पुणे मेट्रोस्थानकावरील एक मोठा अनर्थ टाळला. खेळता खेळता एका लहान मुलाचा तोल गेला आणि मेट्रोच्या रुळावर जावून पडला. ही घटना मेट्रो स्थानकावर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही घटना शुक्रवारी पुण्यातील मेट्रोच्या शिवाजी नगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर घडली आहे. दरम्यान खेळता खेळता त्याचा तोल गेला आणि ट्रकवर पडला आणि त्याला वाचवण्याच्या नादात आईने देखील ट्रकवर उडी मारली आणि दोघेही ट्रकवर पडले.( हेही वाचा- मेट्रो मार्ग 3 चा पहिला टप्पा या वर्षअखेरीस कार्यान्वित होण्याची शक्यता )

ही घटना पाहून प्रवाशांनी आणि सुरक्षा रक्षकांनी धाव घेत दोघांचा ही जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वेळीच सुरक्षा रक्षकाने जर धाव घेतला नसला तर दोघांचा जीव गेला असता. दुपारी एक मुलगा आई सोबत असताना मेट्रोच्या स्थानकावर खेळत होता. काही काळ मेट्रो स्थानकावर गोंधळ निर्माण झाला होता.

मेट्रो स्थानकांवर असलेले सुरक्षा रक्षक यांना घटना लक्षात येताच त्यांनी हुशारीने काम केले. सिक्युरिटी बटण वेळच दाबले. त्यामुळे स्टेशनच्या ३० मीटर आधी ट्रेन थांबली आणि आई आणि मुलाचे प्राण वाचले.