Pune Lockdown: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. अशातच आता डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या वेरियंटमुळे भीती व्यक्त केली जात आहे. हे नवे वेरियंट अत्यंत धोकादायक असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळेच पुण्यात आता पुन्हा एकदा लॉकडाउनचे नियम कठोर करण्यात आले आहेत. हे नियम येत्या 28 जून 2021 पासून लागू करण्यात येणार असल्याचे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तर निर्बंध कठोर केल्यानंतर काही गोष्टी सुरु किंवा बंद ठेवण्यात येतील असे ही सांगण्यात आले आहे.(Delta Plus Variant: मुंबई सह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 निर्बंध; पहा काय सुरु आणि बंद?)
पुणे आयुक्तांनी कोरोना19 ची साखळी तोडण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार कोणत्या गोष्टी सुरु राहणार किंवा बंद राहणार याबद्दल एक परिपत्र काढले आहे. तर जाणून घ्या पुण्यातील लॉकडाउनच्या निर्बंधाबद्दल अधिक.(COVID-19 Third-Wave: डेल्टा प्लस व्हेरिएंटने महाराष्ट्राची चिंता वाढवली, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता)
- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.
-अत्यावश्यक दुकानांच्या व्यतिरिक्त अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु असतील. शनिवार आणि रविवार पूर्णत: बंद राहतील.
-मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी नसणार आहे.
-रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत बसण्यास सुरु असतील. पण तेव्हा 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद राहतील.
-लोकल ट्रेनमधून फक्त वैद्यकिय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे.
-पुणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे किंवा सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.
-सूट देण्यात येत असलेल्या आस्थापन/सेवा व्यतिरिक्त सर्व खासगी कार्यालये कामाच्या दिवशी 50 टक्के कर्मचाऱ्यांसह दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
-पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा आणि कोविड19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेत राज्यात 50 लाख रुग्णांना संसर्ग होण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे. त्यापैकी 8 लाख लोकांना हॉस्पिटलची गरज भासणार आहे. त्याचबरोबर एकूण संसर्ग झालेल्यांपैकी 10 टक्के म्हणजेच 5 लाख रुग्ण लहान मुलं असणार असल्याचेही ते म्हणाले.