पुण्यातील केशकर्तनालयात केली जाते सोन्याच्या वस्तऱ्याने शेविंग, रेझरची किंमत ऐकून व्हाल थक्क
सोन्याचा वस्तरा (Photo Credits-Facebook)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) परिस्थितीत बहुतांश रोज बेरोजगार झाले तर काहींवर उपासमारीची वेळ आल्याचे दिसून आले. याच दरम्यान, काही जणांनी आपल्यातील कलागुणांना वाव देत आपले स्वत:चे उद्योग सुरु केले असून त्याची आता सर्वत्र चर्चा ही होत आहे. याच पार्श्वभुमीवर पुण्यातील (Pune) देहूगावात केशकर्तनालय चालवणाऱ्या दोन पट्ट्यांची जोरदार चर्चा होत आहे. अविनाश बोरुंदिया आणि विक्की वाघमारे अशी त्यांची नावे आहेत. कारण यांच्या केशकर्तनालयात चक्क सोन्याच्या वस्तऱ्याने ग्राहकांची शेविंग केली जाते.

लॉकडाऊमुळे यांचे केशकर्तनालय बंद ठेवण्याची वेळ आली होती. तसेच लॉकडाऊन जसा हळूहळू उठवण्यात आला त्यानंतर सुद्धा ग्राहकांची बहुतांश गर्दी व्हायची नाही. यासाठी त्यांनी एक अनोखी शक्कल लढवत ग्राहकांची सोनाच्या वस्तऱ्याने शेविंग करण्याचे ठरवले. तर अविनाश याने आजतक यांना असे म्हटले की, केशकर्तनालयात नेहमीच ग्राहकांची गर्दी व्हावी यासाठीच त्यांनी ही गोष्ट करण्याचे ठरविले.(Satara: इंधनाचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर अन् साताऱ्यातील विहिरींमध्ये पाण्याऐवजी पेट्रोल) 

अविनाश आणि विक्की यांनी पुण्यातील लोकांना सोन्याच्या प्रति आपलेपण असल्याचे त्यांनी केलेल्या अभ्यासातून कळले. तेव्हाच त्यांनी आपण आपल्या केशकर्तनालयात सोन्याचा वस्तरा तयार करुन त्याने ग्राहकांची शेविंग करण्याचे ठरविले. या दोघांनी चार लाख रुपयांत 8 तोळ्यांच्या सोन्याचे रेजर बनवले. त्यांनी ठरविलेली ही अनोखी शक्कल त्यांच्या कामी येत त्यांच्या केशकर्तनालयात ग्राहकांची रांग लागण्यास सुरुवात झाली. पण सोन्याचा वस्तरा बनवणे ही बाब काही सोप्पी नव्हती. काही लोकांनी यांची ही शक्कल ऐकून थट्टा सुद्धा केली.(पर्यटनाची आवड असणाऱ्या उमेदवारांची नोकरभरती; टुरिस्ट गाईड म्हणून काम करण्यासाठी मिळणार मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण व नोकरीची संधी)

तर केशकर्तनालयात येणाऱ्याला सोन्याच्या वस्तराने शेविंग करायची असल्यास त्याला त्यासाठी 100 रुपये द्यावे लागतात. पण काहींना जर साध्या रेजरने शेविंग करायची असल्यास त्यांच्याकडून 70 रुपये घेतले जातात. अविनाश आणि विक्की यांनी सोन्याचा वस्तरा ठेवण्यासाठी खास लॉकरची सुद्धा सोय केली आहे. सोन्याच्या वस्तऱ्याने शेविंग करण्याची वाढती मागणी पाहता ते येत्या काळात आणखी तीन सोन्याचे वस्तरे बनणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.