Satara: इंधनाचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर अन् साताऱ्यातील विहिरींमध्ये पाण्याऐवजी पेट्रोल
Representational Image | (Photo Credits: PTI)

इंधानाचे दर शंभरीकडे झुकले असताना सातारा (Satara) जिल्ह्यातून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी एक घटना उघडकीस आली आहे. साताऱ्यातल्या सासवड गावाजवळच्या विहिरींमध्ये चक्क पेट्रोल (Petrol) सापडू लागल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला विहिरींमध्ये पाण्याऐवजी पेट्रोल पाहून गावकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, थोड्यावेळाने हा पेट्रोल चोरीचा प्रकार असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. दरम्यान, हजारो लिटर पेट्रोल जमिनीत मुरल्याने त्या भागात असणाऱ्या विहिरीतील पाण्यात पेट्रोल मिसळले गेले आहे. ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसाना झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान पेट्रोलियमची मुंबई-पुणे-सोलापूर अशी 223 किलोमीटरची पाईपलाईन आहे. मात्र, सातऱ्यात चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेणारी उच्च दाबाची पाईपच फोडली. त्या पाईपलाईनला चोरट्यांनी सासवड गावाजवळ मोठे भगदाड पाडले. दरम्यान, हजारो लिटरचे पेट्रोल जमीनीत मुरले. त्यानंतर सासवड गावातील अनेक विहिरींमध्ये पाण्याऐवजी पेट्रोल सापडू लागले. त्यानंतर पेट्रोल चोरीचे गूढ उकलले आहे. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. हे देखील वाचा- Washim: धक्कादायक! गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणांवरून एका तरूणाची चाकू भोसकून हत्या; वाशिम येथील घटना

पेट्रोल चोरी केलेली ही पहिली घटना नाही. याआधी विविध शहरात पेट्रोल चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपींवर कडक कारवाई केली जात असून त्यांना तुरंगवासही भोगावा लागत आहे.