Pune Fire (Photo Credits-ANI)

Pune Fire Update: पुण्यात शुक्रवारी मध्यरात्री फॅशन स्ट्रिटवर लागलेल्या भीषण आगीप्रकरणी 400 हून अधिक दुकाने जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न केल्यानंतर ती विझवण्यास यश आले. मात्र एक दु:ख बातमी म्हणजे अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. प्रकाश हसबे असे त्यांचे नाव आहे.(Pune Fashion Street Market Fire: पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये लागलेली आग 3 तासांनंतर आटोक्यात; आगीत 500 दुकानांचं नुकसान) 

प्रकाश हसबे फॅशन स्ट्रिटवर लागलेल्या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी आपले कर्तव्य बजावत होते. मात्र त्यानंतर ते घरी परताना त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हसबे यांनी दुर्घटनेप्रकरणी माहिती घेतल्यानंतर पहाटे 4.30 वाजता ते तेथून निघाले. हसबे यांनी त्यांच्यासोबत सहकर्मचाऱ्याला सुद्धा घेऊन निघाले जेणेकरुन काही वेळात परतता येईल. त्याच दरम्यान पुणे अहमदनगर रोडवर त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.(मुंबईतील प्रभादेवी भागात विद्युत तारांच्या गोदामात भीषण आग)

Tweet:

फॅशन स्ट्रिट येथे रात्री 11 वाजताच्या सुमारास आग लागली. त्यावेळी 18 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही पाण्याचे टँकर्स सुद्धा तेथे आले. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी खुप प्रयत्न केल्यानंतर मध्यरात्री 1.30 वाजता त्यावर नियंत्रण मिळवण्यास यश आले. यामध्ये हसबे आगीच्या दुर्घटनेप्रकरणासंदर्भात सर्व सुचना देत होते.