Pune Fashion Street Market Fire: पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये लागलेली आग 3 तासांनंतर आटोक्यात; आगीत 500 दुकानांचं नुकसान
Pune Fashion Street Market Fire (PC - ANI)

Pune Fashion Street Market Fire: पुणे शहरातील कॅम्प परिसरातील (Camp Area) फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग तब्बल तीन तासानंतर आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मार्केटमधील 500 दुकानांचं मोठ नुकसान झालं आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु, याठिकाणी कपड्याची दुकानं आणि गोदामं असल्याने आग मोठ्या प्रमाणात परसरली.

आगीची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या 15 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन जवानांच्या अथक परिश्रमातून आगीवर तब्बल तीन तासानंतर नियंत्रण मिळवण्यात आले. फॅशन स्ट्रीटमधील अतिशय अरुंद रस्त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचण येत होती. (वाचा - Bhandup Fire: भांडुप येथील मॉलला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाकडून बचाव कार्य अद्याप सुरु)

दरम्यान, शुक्रवारी भांडुप येथील ड्रीम मॉल येथे लागलेल्या आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयात हे रुग्ण कोरोनावर उपचार घेत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.