Bhandup Fire (Photo Credits-ANI)

Bhandup Fire: मुंबईतील भांडुप येथे मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ड्रीम मॉलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी माहिती मिळताच अग्निशमन दलातील 20 पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आले असून अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. मात्र या दुर्घटनेत कोविड19 च्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Mumbai Sea Coast Guard: तटरक्षक दलाने उधळला घातपाताचा डाव, अरबी समुद्रात 4900 कोटींचे ड्रग्ज, पाच AK 45 जप्त)

महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. तर मध्यरात्री पासून बचाव कार्य वेगाने सुरु आहे. तर सनराईज कोविड रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आग सुरुवातीला पहिल्या मजल्यावर लागल्यानंतर ती वाढत गेली. परंतु मॉलमध्ये कोविड19 चे सेंटर करण्यात आल्याने त्याचे सुद्धा लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु मॉलमध्ये कोरोनाचे रुग्णालय सुरु करण्यास परवानगी कशी दिली गेली असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.(मुंबई: पतीसोबत झालेल्या वादामुळे इमारतीच्या टेरेसवरुन आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेस प्रसंगावधान राखून वाचविणा-या पोलिसाचे अनिल देशमुखांनी ट्विटद्वारे केले अभिनंदन)

Tweet:

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी आग कोणत्या कारणामुळे लागली हे स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले. परंतु प्रथमच एखाद्या मॉलमध्ये रुग्णालय सुरु केल्याचे पाहिले आहे. त्यामुळे कारवाई केली जाणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. तर कोरोना संक्रमितांसह 70 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले आहे.