मुंबई तटरक्षक दलाच्या (Mumbai Sea Coast Guard) सतर्कतेमुळे एका मोठ्या घातपाताचा डाव उधळला आहे. अरबी समुद्रात (Arabian Sea ) काही संशयीत नौका फिरत असल्याचे निदर्शनास येताच तटरक्षक दलाने कारावी केली. तटरक्षक दलाने घेराव घालून संशयित नैका ताब्यात घेतली. या नौकेतून तब्बल 4900 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ (Drugs), 1 हजार जिवंत काडतुसे आणि 5 पाच AK 45 रायफल जप्त करण्यात आल्या. लक्षद्वीप जवळ असलेल्या मिनीकॉय येथे ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार, वरळी येथे मुख्यालय असलेल्या तटरक्षक दलाच्या पश्चिम ताफ्यातील युद्धनौकेने अरबी समुद्रात एका संशयीत नौकेवर कारवाई केली. या संशयीत नौकेला घेरण्यात आले आणि या नौकेची तपासणी करण्यात आली. समुद्री संरक्षण मोहिमेद्वारा ही कारवाई करण्यात आली. या वेळी हवाई समन्वयही चांगल्या प्रकारे ठेवण्यात आला. (हेही वाचा, अरबी समुद्रात अडकलेल्या 264 मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाकडून सुटका (Watch Video))
काय घडले नेमके?
तटरक्षक दलाची गस्ती नौका नेहमीप्रमाणे अरबी समुद्रात गस्त घालत होती. या वेळी तीन मच्छिमार नौका संधिग्द आवस्थेत आढळून आल्या. त्यामुळे गस्ती नौकेवर असलेल्या अधिकाऱ्यांचा संशय वाढला. या अधिकारऱ्यांनी हवाई टेहळणी विभागाला या नौकांबाबत तातडीने माहिती दिली. टेहळणी विभागाच्या विमानाने हेवेत झेप घेतली आणि समुद्रात घिरट्या घातल्या. काही मिनिटांमध्येच या विमानाने या संशयीत नौकांबाबत आणि या नौकांचे नेमके ठिकाण गस्त घालणाऱ्या नौकांना कळवले. त्यानुसार या नौकांनी कारवाई करुन संशयीत नौका ताब्यात घेतली.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तीनपैकी 'रवीहंसी' नावाची नौका अंमली पदार्थांची वाहतूक करत होती. या नौकेला इतर दोन नौका सुरक्षा पूरवत होत्या. या तिन्ही नौकांवर मिळून 19 खलाशी होती. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे.