
Husband-Wife Relationship: लग्नासाठी आलेले स्थळ पसंत नसेल तर त्यास नकार देणे ही अगदी सामान्य प्रक्रिया. देशभरात विवाह (Marriage) निश्चित करताना हीच पद्धत वापरली जाते. पण, पुणे (Pune Crime) जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यात काहीसा विपरीत प्रकार घडला. कुटुंबीयांनी विवाह तर निश्चित केला. पण, नियोजीत वर म्हणजेच नवरदेव पसंत नाही या कारणास्थव नवरी मुलगी भलतीच अस्वस्थ झाली. त्यातून तिने कहर असा केला की, चक्क नियोजीत नवरदेवाच्या हत्येची सुपारी (Contract Killing) दिली. सुपारी घेतलेल्या आरोपींनी या तरुणास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. सूपारी देणारी नवरी मुलगी मात्र अद्याप फरार आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नवऱ्या मुलाच्या हत्येचा कट
मयूरी दांडगे असे आरोपी तरुणीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडे या तरुणीचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील तरुणासोबत निश्चित झाला होता. हा तरुण हॉटेलमध्ये कुक म्हणून नोकरीस होता. वर आणि वधू अशा दोन्ही बाजूंकडील कुटुंबीयांनी विवाह निश्चित केला. परंत, मयुरी हीस हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे ती नाराज होती. त्यामुळे सदर तरुणास जीवे मारण्याचा कट तिने आणि संदी गावडे यांनी ठरवाल. त्यासाठी तब्बल 1,50,000 रुपयांची सुपारी देण्यात आली. (हेही वाचा, UP Shocker: मुझफ्फरनगरमध्ये लग्नाच्या दिवशीच वधू गेली गर्लफ्रेंडसोबत पळून; लाजीरवाणा प्रसंग टाळण्याची कुटुंबाने पसरवली मृत्यू झाल्याची अफवा)
लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
दरम्यान, खंडणी घेतलेल्या आरोपींनी कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील नवरदेव तरुणास बेदम मारहाण केली. हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या या तरुणास आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाला. ही घटना यवत पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंड तालुक्यातील खामगाव फाटानजीक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात तक्रार आल्यानंतर यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 109,352,351 यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये ही मारहाण सुपारी दिल्याने घडवूण आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीमध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. (हेही वाचा: Bengaluru Woman Trap Of An Astrologer: प्रेमविवाह होईल, पण कुंडलीत दोष आहे...; 24 वर्षांची तरुणी अडकली ज्योतिषाच्या जाळ्यात; 5.9 लाख रुपये गमावले)
पोलिसांनी अटक केलेले आरोपी
- आदित्य शंकर दांडगे
- संदीप दादा गावडे
- शिवाजी रामदास जरे
- सुरज दिगंबर जाधव
- इंद्रभान सखाराम कोळपे
पोलिसांनी वरील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे रा.गुघलवडगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तरुणीने सुपारी दिल्याचा आणि पुढे हत्येसाठी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. घडल्या प्रकाराची माहिती कळाली तेव्हा दोन्ही कुटुंबास आश्चर्याचा धक्का आणि दु:खाचा डोंगर कोसळला आहे.