Bengaluru Woman Trap Of An Astrologer (फोटो सौजन्य - संपादित प्रतिमा)

Bengaluru Woman Trap Of An Astrologer: बेंगळुरू (Bengaluru)मधून अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका 24 वर्षीय महिलेला एका बनावट ज्योतिष्याने (Astrologer) सुमारे 5.9 लाख रुपयांचा गंडा घातला. तरुणीने ज्योतिषाला तिच्या प्रेमविवाहा होईल की, अरेंज्ड मॅरेज यासंदर्भात विचारले होते. या ज्योतिषाने पीडित मुलीला आपली ओळख विजय कुमार अशी करून दिली. त्याने मुलीला सांगितले की, तिचा प्रेमविवाह होईल, पण तिच्या कुंडलीत काही ग्रहदोष आहेत. हे दोष विशेष पूजा करून दूर करता येतात. त्याने पूजेच्या नावाखाली मुलीकडून पैसे उकळले. पीडित तरुणी एका खाजगी कंपनीत काम करते.

प्राप्त माहितीनुसार, 5 जानेवारी रोजी तरुणीने इंस्टाग्रामवर 'splno1indianastrologer' नावाचे अकाउंट पाहिले. प्रोफाइलमध्ये एका अघोरी बाबाचा फोटो होता. वापरकर्त्याने स्वतःचे वर्णन 'तज्ज्ञ ज्योतिषी' असे केले होते. प्रियाने त्या व्यक्तीला मेसेज केला. त्याने आपले नाव विजय कुमार असे सांगितले आणि त्याचा मोबाईल नंबर शेअर केला. त्याने प्रियाला तिची जन्मतारीख आणि नाव व्हाट्सअॅपवर पाठवायला सांगितले. जेणेकरून तो तिची कुंडली तपासू शकेल. (वाचा - World War 3 prediction: '18 जूननंतर कधीही तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते'; भारतीय ज्योतिष कुशल कुमार यांचे भाकित)

तथापी, मुलीने तिची माहिती ज्योतिषाबरोबर शेअर केली. त्यानंतर आरोपी विजय कुमारने पीडित मुलीला सांगितले की, तिचा प्रेमविवाह होईल. परंतु, यासाठी तिला एक पूजा करावी लागेल. या पूजेसाठी त्याने 1820 रुपये दिले. आरोपीने डिजिटल पेमेंट अ‍ॅपद्वारे पैसे मागितले. तरुणीने पैसे पाठवले. यानंतर, त्याने तरुणीच्या वैवाहिक जीवनाबद्दल आणि भविष्याबद्दल वेगवेगळ्या कथा रचल्या. तो वेगवेगळ्या पूजांच्या बहाण्याने पैसे मागत राहिला. प्रियाने त्याला सुमारे 6 लाख रुपये दिले.

यानंतर आरोपी तरुणीला वारंवार पैशाची मागणी करू लागला. त्यानंतर तरुणीला समजले की, तो तिचा गैरफायदा घेत आहे. तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला. तसेच तरुणीने त्याला आपण दिलेले पैसे परत करण्यास सांगितले. आरोपीने तरुणीला 13 हजार रुपये परत केले. त्यानंतर आरोपीने जर तरुणीने जास्त पैसे मागितले तर तो आत्महत्या करेल आणि सुसाईड नोटमध्ये तिचे नाव लिहीलं, अशी धमकी त्याने दिली. या सर्व प्रकरणानंतर तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि बीएनएस कलम 318 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.