World War 3 prediction: '18 जूननंतर कधीही तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते'; भारतीय ज्योतिष कुशल कुमार यांचे भाकित
Photo Credit -Pixabay

World War 3 prediction: जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या (World War 3)उंबरठ्यावर असून ते काही दिवसांत सुरू होऊ शकते. भारताचा नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखले जाणारे कुशल कुमार (Astrologer Kushal Kumar)यांनी ब्रिटिश मीडियासोबत बोलताना हे भाकित केले आहे. डेली स्टार या ब्रिटिश मीडियासोबत बोलताना कुशल कुमार यांनी म्हटले की, १८ जूननंतर कधीही तिसरे महायुद्ध (World War 3 prediction)सुरू होऊ शकते. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी यांचा मे महिन्यात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांनी केलेल्या भाकिताचा त्यांनी पुनरुच्चार केला. आपल्या दाव्याचे समर्थन करताना कुमार यांनी अनेक घटनांचा हवाला दिला. कुमार यांनी भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला, ज्यामध्ये नऊ हिंदू यात्रेकरू मारले गेले.

असे भाकित करताना कुमार म्हणाले की त्यांनी आपली भविष्यवाणी करण्यासाठी हिंदू संस्कृतीवर आधारित वैदिक ज्योतिष चार्ट वापरला. ज्यात कर्म, ग्रह आणि तारे यांचे वाचन केले आणि त्यात जागतिक संघर्षाची नेमकी तारीख दर्शविली.

महायुद्ध कधी सुरू होऊ शकते?

कुशल कुमार यांनी याआधी 10 जून रोजी तिसरे महायुद्ध सुरू होईल, असे भाकीत केले होते, परंतु ती तारीख निघून गेली आहे. तथापि, त्यांचा असा विश्वास आहे की बहुधा तारीख 18 जून आहे. यासोबतच त्यांनी २९ जूनला आणखी एक संकट येणार असल्याचे वर्णन केले आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या अंदाजाने जगभरात चिंता वाढवली आहे. विशेषत: सध्या ज्या प्रकारे जगाच्या विविध भागात संघर्ष वाढत आहेत. जीवितहानी होत आहे. त्यामुळे लोक प्रचंड घाबरले आहेत. यात सुरक्षित असलेल्या देशातील नागरिकांचाही समावेश आहे.

कुमार यांनी बोलताना उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामधील झालेल्या गोळीबाराचा संदर्भ दिला. इस्त्रायील आणि हमास यांच्यातील वाढत्या तणावामुळे तिसरे महायुद्ध होऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी क्युबामध्ये रशियन आण्विक पाणबुडीच्या आगमनाबाबतही सांगितले, जे 1962 च्या क्षेपणास्त्र संकटानंतर रशियासाठी एक मोठे पाऊल मानले जाते.

दरम्यान, नॉस्ट्रॅडॅमस हा मूळचा फ्रेंच शब्द आहे. ज्याचा अर्थ ज्योतिषी असा होता. "लेस प्रोफेटीज" हे पुस्तक प्रकाशित केले. ज्यात 2024 या वर्षासह भविष्यासाठी अंदाज वर्तवले आहेत असे मानले जात आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालात म्हटले आहे की, नॉस्ट्रॅडॅमसने भाकीत केले आहे की 2024 मध्ये नौदल युद्ध, घराणेशाही गोंधळ, गंभीर हवामान घटना आणि जागतिक संघर्ष होतील.

नॉस्ट्राडेमसने "नौदल लढाई" ची भविष्यवाणी केली होती ज्यात चिनी नौदल तैवान बेटावर हल्ला करू शकते.