Hang | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

दैंनदिन जीवनात मोबाईलाचा वापर अधिक वाढला असून तरूणांमध्ये आता मोबाईलचे अधिक व्यसन जडल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मोबाईलमुळे नको त्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. यातच नेहमी मोबाईलमध्ये मग्न असलेल्या एका तरुणाला घरचे ओरडले म्हणून 20 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्हा येथील आंबेगाव (Ambegoan) तालुक्यातील काशिमबेग (Kashimbeg) गावात घडली आहे. या घटनेची मंचर पोलीस ठाण्यात (Manchar Police Station) नोंद करण्यात आली असून पुढील चौकशीला सुरु आहे. या घटनेमुळे आजुबाजूच्या परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. तसेच आपल्या पाल्यांसोबत कसे वागायचे असाही प्रश्न पालकवर्गांच्या समोर पडला आहे.

हृतिक सुरेश मानकर असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हृतिक हा मंचर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. हृतिकचे वडील हे मुंबईत नोकरी करतात. साप्ताहिक सुट्टीला ते घरी येतात. हृतिक हा सतत मोबाईलमध्ये गुंतलेला त्याच्या वडिलांच्या निदर्शनास आले. हृतिकचा अधिकाधिक वेळ हा मोबाइलवर जातो. त्यामुळे हृतिकचे पालक रविवारी त्याला पालक रागावले आणि मोबाईलचा वापर कमी करण्याची ताकीद दिली. वडील ओरडले म्हणून तो रागाने घरातून निघून गेला. परंतु, बराच वेळ झाला असून हृतिक घरी परतला नाही. यामुळे त्याचे पालक चिंता करू लागले. दरम्यान, त्यानी हृतिक फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, हृतिककडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे पालकांना त्याची काळजी वाटू लागली. अखेर त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी घराजवळ असलेल्या शेडमध्ये छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो दिसला. त्यावेळी हृतिकच्या पालकांनी त्याला खाली उतरवले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, तिथे त्याला मृत घोषीत केले. हे देखील वाचा- Pune: युवतीने सर्जिकल ब्लेडने गळा कापून केली आपल्या लिव्ह-इन जोडीदाराची हत्या; स्वतः पोलिसांत जाऊन दिली माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे वडील मुंबईत नोकरी करत असून केवळ आठवड्यातून एक दिवस ते घरी येतात. परंतु, आपला मुलगा सतत मोबाईलमध्ये काहीतरी करत बसतो. यामुळे त्याचे इतर गोष्टीवरून दुर्लक्ष होत आहे, हे समजताच त्याच्या पालकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्न फसला आणि त्यांना आपला मुलगा गमवावा लागला.