Pune: युवतीने कोयत्याने गळा कापून केली आपल्या लिव्ह-इन जोडीदाराची हत्या; स्वतः पोलिसांत जाऊन दिली माहिती
महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यात हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका तरूणीने तिच्या मित्राची सर्जिकल ब्लेडने गळा कापून हत्या केली आहे. हे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते
महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यात हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका तरूणीने तिच्या मित्राची कोयत्याने गळा कापून हत्या केली आहे. हे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही दिवसांपासून दोघांमधील नात्यामध्ये तणाव सुरू होता, ज्यामुळे या युवतीने हे पाऊल उचलले.
मंगळवारी या महिलेने स्वतः सिंहगड रोड पोलिस ठाण्यात जाऊन, पोलिसांना आपण आपल्या जोडीदाराचा खून केला असल्याची माहिती दिली. सध्या पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. हा खून केल्यानंतर युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सध्या ती गर्भवती असल्याने तिने हा विचार टाळला व त्याऐवजी ती पोलिसांकडे गेली.
या मुलीने दिलेल्या माहितीनंतर, पोलिसांची टीम त्यांच्या नऱ्हे येथील फ्लॅटवर गेली, त्यावेळी मुलाचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला आणि हत्येमध्ये वापरलेले हत्यारही तिथेच पडले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या दोघांचे आळंदी येथे लग्न झाले होते, मात्र तरीही युवक हे नाते निभावण्यासाठी प्रयत्न करत नव्हता. यामुळे ही युवती नाराज होती. (हेही वाचा: आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या)
गेल्या वर्षी या युवतीने युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता आणि मंगळवारी या खटल्याची सुनावणी कोर्टात होणार असल्याचे, पोलिस तपासात समोर आले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून मृतक युवतीला ही केस मागे घेण्यास सांगत होता तसेच याबाबत त्याने अनेक वेळा तिला धमकावलेही होते. सुनावणी होण्याआधी तो आपले मूळ गाव जत येथून तिला भेटायला पुण्याला आला होता. यावेळी दोघांमध्ये भांडण झाले. युवक झोपल्यानंतर युवतीने कोयत्याने त्याचा गळा कापला. पोलिसांनी सांगितले की, गेल्या वर्षी मे महिन्यात तिला कळले होती की, या युवकाचे दुसरीकडे लग्न झाले आहे, त्यानंतर ती अस्वस्थ होती.
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2020 03:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

