पुणे: पाकिस्तानी झेंड्यावर लायटर फ्री; घरात घुसून धडा शिकवा, लोक व्यक्त करतायत संताप
Pulwama Terror Attack: Lighter free with Pakistani flags in Pune | (Photo Credits: Twitter)

Pulwama Terror Attack: जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पुणे (Pune) येथेही ही लाट कायम असून, लोक विविध मार्गांनी आपला संताप व्यक्त करत आहेत. पुणे येथील प्रसिद्ध असलेल्या मुरुडकर झेंडेवाले (Murudkar Zendewale ) यांच्याकडून काहीशा आक्रमक आणि वेगळ्याच पद्धतीने निषेध व्यक्त केला जात आहे. मुरुडकर झेंडेवाले हे पाकिस्तानी झेंड्यासोबत (Pakistani Flags) लायटर (Lighter) आणि काडीपेटी फ्री ( Match Box) देत आपला निषेध व्यक्त करत आहे. अनेक पुणेकरांनी मुरुडकर झेंडेवाले यांना प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे या पूर्वी पाकिस्तानी झेंड्यांना यापूर्वी कधीच झाली नव्हती इतकी मागणी गेले दोन दिवस या झेंड्यांना होत आहे.

मुरूडकर झेंडेवाले यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या नापाक हरकतीमुळे देशभरात संतापाची लाट आहे. पाकिस्तान जर आपल्या जवानांचे प्राण घेत असेल. आपल्यावर हल्ला करत असेल तर, आपण त्यांचे झेंडे का जाळू नयेत? असा सवाल नागरिक विचारत आहेत. तसेच, भारतीय नागरिकांची लोकभावना पाकिस्तानपर्यंत पोहोचावी यासाठी आपणही झेंडा खरेदी करणाऱ्याला लायटर आणि काडीपेटी फ्री देवून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहोत असे मुरुडकर झेंडेवाले यांनी म्हटले आहे.

चौदा फेब्रुवारी या दिवशी जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ला केला. CRPF जवानांच्या ताफ्यावर झालेल्या या हल्ल्यात तब्बल 42 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतपाची लाट निर्माण झाली आहे. पाकिस्तानला धडा शिकवा, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. (हेही वाचा, पांढरकवडा:'गो बॅक मोदी ' यवतमाळ दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात झळकले बॅनर)

देशात असे वातावरण असताना विविध विकासकामांचे आयोजन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रातील दोन जवानाही या हल्ल्यात शहीद झाले आहेत. एकूण परिस्थितीवरुन महाराष्ट्रातही संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमिवर आजच्या कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.