Prime Minister Narendra Modi to Visit Maharashtra: महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात यवतमाळे येथे आज (16 फेब्रुवारी) 'गो बॅक मोदी ' ( Go Back Modi) असे बॅनर झळकले. विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विदर्भ आणि खान्देशाच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींना बॅनर झळकवून विरोध होत असल्याचे समजताच पोलिसांनी हे बॅनर हटवल्याचे समजते. दरम्यान, हे बॅनर युवक काँग्रेसने लावल्याचे समजते.
चौदा फेब्रुवारी या दिवशी जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ला केला. CRPF जवानांच्या ताफ्यावर झालेल्या या हल्ल्यात तब्बल 42 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतपाची लाट निर्माण झाली आहे. पाकिस्तानला धडा शिकवा, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे.
दरम्यान, देशात असे वातावरण असताना विविध विकासकामांचे आयोजन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रातील दोन जवानाही या हल्ल्यात शहीद झाले आहेत. एकूण परिस्थितीवरुन महाराष्ट्रातही संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमिवर आजच्या कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; योजनांच्या उद्घाटनासह असा असेल कार्यक्रम)
पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक पाहण्यासाठी खालील प्रतिमेचा संदर्भ घ्या
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र (विदर्भ-खान्देश) दौऱ्यावेळी राज्यपाल के. विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर उपस्थित असतील. तसेच,भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक नागरिकही या कार्यक्रमास उपस्थित असणार आहे.