लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रचाराचा तडाका सुरु केला आहे. आज ते एका दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींच्या हस्ते आज विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहेत. शिवाय ते दोन जाहीर सभांनादेखील संबोधित करणार आहेत. नागपूर, धुळे, यवतमाळ, नांदेड अशा ठिकाणी पंतप्रधानांचा हा दौरा आहे. सकाळी 10 वाजता मोदी नागपूर येथे पोहचतील. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच सुभाष भामरे असणार आहेत.
सकाळी 10 वाजता पंतप्रधान नागपूरला पोहचल्यानंतर ते हेलिकॉप्टरने यवतमाळला रवाना होतील. जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या कामाची पाहणी आणि कौतुक ते करणार आहेत. या ठिकाणी ते जाहीर सभादेखील घेणार आहेत.
नांदेड येथील एकलव्य आदर्श निवासी शाळेचे बटण दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करतील, नागपूर-अजनी-पुणेदरम्यान धावणाऱया या गाडीला व्हिडीओ लिंकद्वारे पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत बांधण्यात येणाऱया भूमिपूजनाचे पंतप्रधान बटण दाबून उद्घाटन करतील. (हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाशिम दौरा रद्द
धुळ्यातील कार्यक्रम –
सुलवाडे-जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेची पायाभरणी, धुळे शहरातील पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन, धुळे-नरवाडा रेल्वेमार्ग व भुसावळ-वांद्रे खान्देश एक्स्प्रेस या रेल्वेला पंतप्रधान व्हिडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील. धुळ्यात मोदींची जाहीर सभादेखील होणार आहे, येणाऱ्या निवडणुकीसाठी मोदींची खानदेशातील ही पहिलीच सभा असणार आहे.