Chief Minister Devendra Fadnavis | (Photo credits: file photo)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Chief Minister Devendra Fadnavis) यांचा वाशिम, बुलढाणा ( Buldhana Tour) दौरा अर्ध्यातूनच रद्द करण्यात आला आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे बुलढाणा- वाशिम दौऱ्यावर होते. अचानक त्यांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवू लागले. दरम्यान, सिंदखेड राजा येथील कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहिले.परंतु, तेथे त्यांना अधिकच अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी पुढील दौरा रद्द केला आणि ते औरंगाबाद विमानतळावर गेले. औरंगाबाद विमानतळ ते मुंबई (Aurangabad Airport to Mumbai) असा विमानप्रवास करुन ते मुंबईला परतले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

देवेंद्र फडणवीस यांना दौऱ्यादरम्यान पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर पुढील दौरा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. सरकारद्वारे करण्यात आलेली विविध विकासकामे आणि संभाव्य कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री बुलढाणा, वाशिम दौऱ्यावर होते. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता सिंदखेडराजा येथे दाखल झाले. येथील विकासकामाचे उद्घाटन करुन ते पुढे वाशिम दौऱ्यासाठी रवाना होणार होते. नेमका त्यादरम्यानच मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ लागला. (हेही वाचा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अत्यावस्थ; रुग्णालयात दाखल)

दरम्यान, मख्यमंत्री फडणवीस यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजकीय मंडळी सामाजिक कामात सतत व्यग्र असतात. त्यांचे वेळी अवेळी कार्यक्रम ठरलेले असतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या वेळा आणि व्यक्तिगत दैनंदिन जीवन यांचा मेळ अनेक मंडळींकडून घातला जात नाही. परिणामी त्यांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे अनेक उदाहरणांतून पुढे आले आहे.