ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अत्यावस्थ; रुग्णालयात दाखल
Anna Hazare | (Photo credits: file photo)

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Social activist Anna Hazare) यांना प्रकृती अत्यावस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशक्तपणामुळे अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर नोबेल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोकपाल आणि विविध मागण्यांसाठी अण्णांनी नुकतेच उपोष केले होते. सात दिवस केलेल्या या प्रदीर्घ उपोषण काळात अण्णांचे वजन कमालीचे घटले होते. दरम्यान, अण्णांनी उपोषण मागे घेतले. मात्र, आता अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अण्णांच्या शरीरात अशक्तपणाचे प्रमाण वाढले आहे. अहमदनगर येथील नोबेल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यनंतर त्यांची प्रकृती पूर्ववत होईल. त्यांतर दोन दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असे सूत्रांनी म्हटले आहे. उपोषण काळात अण्णांच्या प्रकृतिवर अधिक ताण आल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. (हेही वाचा, अण्णा हजारे यांच्या जीवाशी खेळू नका - उद्धव ठाकरे यांचे आवाहन, उपोषणाच्या पाचव्या दिवशी अण्णांची प्रकृती ढासळली)

लोकपाल आणिव विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीपासून आंदोलन सुरु केले होते. या वेळी अण्णांनी आपल्या गावी म्हणजे राळेगणसिद्धी येथेच उपोषण सुरु केले होते. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी प्रयत्न केले. मात्र, ही शिष्टाई कामी न आल्याने स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची भेट घेतली. त्यानंतर अण्णांनी आपले उपोषण मागे गेतले. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी राळेगणसिद्धीला जाऊन अण्णांची भेट घेतली होती. तसेच, त्यांच्या आंदोलनाला पाठींबाही दिला होता.