Anna Hazare (File Photo) | Photo Credits: ANI

Anna Hazare Hunger Strike Day 5: लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीची मागणी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा अशा मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. शरीरात जीव असेपर्यंत उपोषण करणारच या भूमिकेवर ठाम असलेल्या अण्णांची प्रकृती ढासळत आहे. शिवसेनेने अण्णांच्या लढ्याला पाठींबा दिला असला तरीही लढा सुरु ठेवा पण उपोषण सोडा असं आवाहन केले आहे. 'अण्णांच्या जीवाशी खेळू नका' असं म्हणत उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर टीका केली आहे. अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी अण्णा हजारेंना पत्र पाठवून उपोषणाला शुभेच्छा असं म्हटलं होतं, मात्र हा प्रकार संतापजनक असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी अण्णा हजारेंच्या जीवाशी खेळू नका असं सरकारला आवाहन केलं आहे. अण्णांच्या मानधरणीसाठी सरकारकडून मंत्री गिरीश महाजन राळेगण सिद्धीला रवाना झाले आहेत. काल मीडियाशी बोलताना अण्णांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये जर माझ्या जीवाचं काही बरं -वाईट झालं तर मोदी त्याला जबाबदार असतील असं म्हटलं होतं. अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस; सरकारविरोधात राळेगणसिद्धी मध्ये ग्रामस्थांचं जेलभरो आंदोलन

अण्णा हजारे यांचं हेल्थ अपडेट

आज (३ फेब्रुवारी ) अण्णा हजारेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे, डॉक्टरांनी अण्णांची प्रकृती खालावत असल्याचं आणि अधिक धोकादायक बनत असल्याचं सांगितलं आहे. अण्णा हजारेंच्या यकृतावर परिणाम झाला आहे. रक्तदाबाचा त्रास सुरु झाला आहे असं म्हटलं आहे. भविष्यात याचा परिणाम अण्णांच्या किडनी आणि मेंदूवर होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

अण्णांच्या उपोषणा ग्रामस्थांनी पाठींबा दिला आहे. पुणे - नगर मार्गावर त्यांनी चक्का जाम आंदोलन सुरु केलं आहे.