राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याकडून कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे. तर मलिक यांनी अण्णा हे पैसे घेऊन उपोषण करतात असा गंभीर आरोप लावला आहे. त्यामुळे मलिक यांच्यावर बदनामी आणि फौदजारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी अण्णांकडून केली जात आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी मलिक यांनी अण्णा हे एका संघटनेचे एजंट असल्याचा दावा केला. त्यामुळे हजारेंच्या समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. तसेच गुरुवारी राष्ट्रवादी नेत्यांची भेट ही अण्णांनी नाकारली होती. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली होती. तर पवार यांनी मलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करत असे सांगितले की, त्या वक्तव्याचा पक्षाशी काही संबंध नाही. यामुळे मी अण्णांकडे दिलगीरी व्यक्त करत आहे. मात्र नवाब मलिक यांच्यकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचे सांगितले जात आहे.(हेही वाचा-अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस; सरकारविरोधात राळेगणसिद्धी मध्ये ग्रामस्थांचं जेलभरो आंदोलन)
तर हजारे यांचे वकील मिलिंद पवार यांनी मलिक यांना या वक्तव्याबाबत कायदेशीर नोटीस पाठविली आहे. नाहीतर लेखी माफी मागा असे अण्णांकडून मलिक यांना खडसावण्यात आले आहे. लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीची मागणी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा अशा मागण्यांसाठी समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) बेमुदत उपोषण केले आहे.