PMC Bank (Photo Credits: Twitter)

पीएमसी बँकेच्या घोटाळाप्रकरणी आरबीआयला कोणतीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. एका आरटीआयच्या अहवालातून केंद्रीय बँकेने असे म्हटले आहे की सप्टेंबर 2019 मध्ये करण्यात आलेल्या एका तक्रारीमधून याबाबत माहिती मिळाली. त्याचसोबत पीएमसी बँकेला 2014 पासून एक ही नोटिस बजावण्यात आली नसल्याचे ही सांगण्यात आले आहे. पीएमसीच्या घोटाळ्याप्रकरणी 6 राज्यातील 15 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांचे नुकसान झाले आहे.

केंद्रीय बँकेकडून 2015 ते 2018 दरम्यान झालेल्या घोटाळ्याची चौकशी केली जात आहे. मात्र या प्रकरणी कोणते अधिकारी तपासणी केली जात आहे याबाबत गुप्तता राखण्यात आली आहे. तर पीएमसी बँक खातेधारकांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण वाधवान पिता पुत्राने त्यांनी तारण ठेवलेले विमाने आणि अत्याधुनिक नौकांची विक्री करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या वस्तूंची विक्री करुन येणाऱ्या पैशांमधून बँक खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत केले जाणार आहेत. परंतु मालमत्तेचे मोजमाप करण्यासाठी बँकेकडून सल्लागार नियुक्तीची जाहिरात झळकवली आहे.(उद्धव ठाकरे यांच्याकडून पीएमसी बॅंकेतील ठेवीदारांना मोठे आश्वासन; पाहा काय म्हणाले गुरज्योतसिंग कीर)

 दरम्यान, पीएमसी बँक घोटाळा हे एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचे प्रकरण आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी रिझर्व्ह बँक समन्वयाने तोडगा काढण्याबाबत पावले टाकत आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न समारंभ, शिक्षणातील अडचणी, तसेच अचानक उद्भवलेल्या आरोग्याच्या तक्रारी आदी कारणासाठी बँक खात्यातून पैसे काढण्यास खातेधारकांना मुभा दिली आहे.दरम्यान, अशा प्रसंगी रक्कम काढायची असेल तर त्याची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत आहे.