उद्धव ठाकरे यांच्याकडून पीएमसी बॅंकेतील ठेवीदारांना मोठे आश्वासन; पाहा काय म्हणाले गुरज्योतसिंग कीर
Gurjyot Singh Keer (Photo Credit: ANI)

आपल्या हक्काचे पैसे परत मिळावे, यासाठी पीएमसी बॅंकेतील खातेदार मोठी तडजोड करत आहेत. यातच पीएमसी बॅंकेतील ठेवीदारांनी (PMC Bank Depositors) महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर (Matoshree) निषेध केला होता. दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे एक शिष्टमंडळ गुरज्योतसिंह कीर (Gurjyot Singh Keer) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आश्वासन दिले असून पुढील आठवड्यात ते आमची भेट घेणार आहे, असे गुरज्योसिंह एएनआयशी बोलत होते.

पीएमसी बॅंकेतील ठेवीदारांचे पैसे अडकले असून आपल्या हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी त्यांच्याकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. यातच पीएमसी बॅंकेतील ठेवीदारांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थानी मोर्चा वळवला होता. दरम्यान, पीएमसी बँक ठेवीदारांचे शिष्टमंडळ गुरज्योतसिंग कीर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, ते आमच्याबरोबर आहेत. तसेच येत्या आठवड्यात ते पुन्हा आमच्याशी भेटणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या व्यवस्थापनाला या प्रकरणाकडे लक्ष देण्यास सांगितले. याप्रकरणी उद्धव ठाकरे आमची मदत करतील, असा विश्वास गुरज्योतसिंह यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. हे देखील वाचा- PMC Bank Crisis: पीएमसी बँकेचे माजी संचालक आणि भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रजनीत सिंहला अटक

एएनआयचे ट्वीट-

पीएमसी बॅंकेत रक्कम ठेवणाऱ्या अनेक ठेवीदारांना पैसे बुडल्याच्या भीतीने आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.