परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे भाजपच्या उमेदवार होत्या व त्यांची लढत त्यांचाच भाऊ धनंजय मुंडे यांच्याशी होती. परंतु जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असण्याचा दावा करणाऱ्या पंकजा यांना पराभव धनंजय यांनी मोठ्या फरकाने केला.
परंतु पराभव पत्कारूनही पंकजा यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचे संकेत दर्शवणाऱ्या हालचाली भाजपाच्या गटामध्ये सुरू असल्याची चर्चा आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्षासाठी केलेलं योगदान आणि पंकजा यांनी निवडून आल्यावर केलेलं काम हे लक्षात घेता, पक्ष अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच एबीपी माझा ने दिलेल्या वृत्तानुसार पहिल्या टप्प्यातच पंकजा यांना मंत्रीपदाची शपथ दिली जाईल.
एक्झिट पोलने दर्शवल्यानुसार भाजप आणि शिवसेना महायुती 220 पार जाऊ शकणार होती. हा आकडा तर राहिला दूरच, भाजपला मोठा धक्का बसला तो म्हणजे अनेक मंत्र्यांच्या पराभवामुळे. पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी तर 30 हजारपेक्षाही जास्त मतांनी पराभव केला. परंतु पंकजा यांना मानणारा वर्ग मोठा आहे हे लक्षात घेऊन भाजपने हा निर्णय घेतला असावा.
Pankaja Munde यांच्या पराभवाची कारणे नेमकी काय... वाचा सविस्तर
इतकंच नव्हे तर पंकजा यांच्यासाठी निवडून आलेल्या आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी देखील दाखवली. त्यात पाथर्डीच्या मोनिका राजळे आणि रासपचे रत्नाकर गुट्टे यांचा समावेश आहे.