Coronavirus Cases in Thane: महाराष्ट्रात शनिवारी 21,907 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. याशिवाय 23,501 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातचं आता ठाणे जिल्ह्यात शनिवारी 1,788 नवे कोरोबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,56,922 पोहोचला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी ठाणे जिल्ह्यात 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,116 इतकी झाली आहे. याशिवाय कल्याणमध्ये 470 नवे कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In State Prison Department: महाराष्ट्रातील कारागृहामधील 2,011 कैदी आणि 416 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण)
Access the DigiThane Dashboard for Containment Zones, Trends & More. CLICK https://t.co/iRQRzQdwdc#CoronaVirusUpdate #CovidNews #Thane
As on 19-September-2020#विशेष #आरोग्य #बुलेटिन
दि. १९ सप्टेंबर २०२०@TMCaTweetAway
क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील pic.twitter.com/wwbe0R6Q7E
— DigiThane (@DigiThane) September 19, 2020
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई शहरामध्ये 2,211 कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे शहरामधील एकूण संक्रमितांची संख्या 1,82,077 वर पोहोचली आहे. याशिवाय 5,105 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तसेच 50 जणांचा कोरोनामुळे बळी गेला.