Coronavirus Cases In State Prison Department: महाराष्ट्रातील कारागृहामधील 2,011 कैदी आणि 416 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण
Coronavirus Cases In State Prison Department: राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी महाराष्ट्रात 21,907 कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या 11,88,015 इतकी झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक कोरोना योध्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

महाराष्ट्रातील तुरूगांमध्ये 2,011 कैदी आणि 416 कारागृतील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तसेच कोरोनामुळे 6 कैदी आणि 4 जेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात राज्य कारागृह विभागाने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 21,907 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 11,88,015 वर)
2,011 prisoners and 416 jail staff tested positive for #COVID19 in prisons across Maharashtra. 6 prisoners and 4 jail staff died of the disease so far: State Prison Department
— ANI (@ANI) September 19, 2020
दरम्यान, राज्यात शनिवारी 434 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली. आतापर्यंत राज्यातील 21235 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. याशिवाय 208 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यापूर्वी येरवडा कारागृहातून 5 कोरोना पॉझिटिव्ह कैदी फरार झाले होते. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2020 09:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).