Nitin Gadkari 62nd Birthday: नितिन गडकरी यांच्या 62व्या वाढदिवशी तीन वर्षाच्या चिमुकल्यासह 'या' नेत्यांनी दिल्या खास शुभेच्छा
Union Minister Nitin Gadkari | (Photo Credits: PTI)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  यांच्या 62 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवगेळ्या नेते मंडळींनी त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत . मात्र यामध्ये एका तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नितीन गडकरी यांचा आजच्या तारखेला, म्हणजेच 27 मे ला नागपूर मध्ये जन्म झाला होता. आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदापासून ते मागील पाच वर्षात रस्ता व वाहतूक मंत्री म्हणून कामगिरी बजावली आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत (Loksabha Elections)  नागपूर (Nagpur Constituency) मतदारसंघातून गडकरी यांची पुन्हा एकदा खासदार पदी निवड झाली आहे, त्यामुळे यावर्षीचा वाढदिवस हा दुहेरी आनांदाचा सोहळा असणार आहे.

लोकसभा निवडणूक 2019 जिंकायची असेल तर नितीन गडकरी यांनी उपपंतप्रधान करा, भाजपाचे माजी मंत्री संघप्रिय गौतम यांनी पत्राद्वारा केली मागणी

चला तर पाहुयात गडकरींच्या वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा..

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ते एक उत्तम आयोजक असून भाजपाला मुळापासून ताकद मिळवून देण्यात त्यांचा मोठाहातभार असल्याचे म्हंटले आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींना विकासाचा झंझावात म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नितीन गडकरी यांनी गंगा नदीची स्थिती सुधारण्यासाठी तसेच रस्ते व जलवाहतूक बळकट करण्यासाठी घेतलेली मेहनतिचे कौतुक करून समर्थकांनी देखील त्यांच्या आरोग्यासाठी व कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदी ट्विट

देवेंद्र फडणवीस ट्विट

अरुण जेटली ट्विट

राजनाथ सिंग ट्विट

निर्मला सीथारामन ट्विट

या सोबतच गडकरींचा सर्वात लहानगा चाहता विश्रुत पलणिटकर याने आपल्या गोड आवाजात  'Happy Birthday' गडकरी आबा असे म्हणत दिल्या आहेत

सौरभ जोशी ट्विट

नितीन गडकरी यांनी भाजपा कडून लोकसभा निवडणूक 2019 मध्ये तब्बल 2 लाख 83 हजार 332 मतांनी आघाडीच्या नाना पटोले यांच्यावर मात केली होती. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बनणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळात आता गडकरींना कोणते पद मिळते याकडे समर्थकांचे लक्ष लागून आहे.