Union Minister Nitin Gadkari | (Photo Credits: PTI)

आगामी लोकसभा निवडणुका 2019 (Loksabha Election 2019)  मध्ये भाजपला यश मिळवण्यासाठी आता भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची सल्लेबाजी सुरु झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि दलित नेते संघप्रिय गौतम (Sangh Priya Gautam) यांनी पक्षांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना उपपंतप्रधान करावे , गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh)  यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी द्यावे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Chouhan) यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाची धुरा द्यावी, असा सल्ला दिला आहे.

देशभरामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाचही राज्यांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता मोदी लाट भारतातून ओसरत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये यश चाखायचं असेल तर त्यांना पक्षामध्ये बदल करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. 2050 पर्यंत अनेक मराठी माणसं पंतप्रधान पदापर्यंत पोहचतील, देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य!

संघप्रिय गौतम यांनी पक्षाच्या वरिष्ठांना पत्र लिहले आहे. त्यांच्यामध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर देशात नरेंद्र मोदी यांचं व्यक्तित्व वाढलं आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जगभरात देशात नाव उंचावलं आहे, संघटनेचा विस्तार झाला आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर पक्षांमध्ये नेतृत्त्व बदल करण्याची गरज असल्याचा सल्ला गौतम यांनी दिला आहे. 88 वर्षीय संघप्रिया गौतम यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये राज्यमंत्री पद सांभाळले होते.