2050 पर्यंत अनेक मराठी माणसं पंतप्रधान पदापर्यंत पोहचतील, देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य!
CM Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

रामदास फुटाणे आणि आशुतोष शेवाळकर यांनी नागपूरमध्ये आयोजित 16 व्या जागतिक मराठी संमेलनात (Marathi Sanmelan)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळेस 2050 पर्यंत एकापेक्षा अनेक मराठी माणसं पंतप्रधान पदापर्यंत पोहचू शकतील असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान पदी ( Prime Minister)  मराठी माणूस कधी विराजमान होईल असा प्रश्न विचारला होता त्यावर उत्तर देताना त्यांनी हे सूचक विधान केलं आहे.

 

जर भारतावर खऱ्या अर्थाने कोणी राज्य केलंय तर ते मराठयांनी केलं आहे. अटकेपार मराठयांचा झेंडा घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्रीय लोकांना देशाचं पंतप्रधान पद दूर नाही. 2050 पर्यंत एकापेक्षा अनेक मराठी लोकं पंतप्रधान पदी विराजमान झालेली असु शकतात असे ते म्हणाले.

नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणापासून, राज्यातील मराठी भाषेच्या अवस्थेबद्दल वक्तव केलं आहे. एका मराठी माणसानेच चित्रपटसृष्टी उभी केली. 21  व्या शतकाला ज्या-ज्या बाबी संचलित करतात, तेथे-तेथे मराठीला ज्ञानभाषा म्हणून रुजवावे लागेल, तरच अधिक चांगले वैभव मराठीला प्राप्त करून देता येईल असेही फडणवीस म्हणाले आहेत.